जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे मोबाईल जागरूकता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विभाग प्रमुख डॉ. के.बी. महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते विभागाचे प्राध्यापक डॉ. विशाल भारुड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. भारुड आपल्या व्याख्यानमध्ये मोबाईलचे दुष्परिणाम आणि फायदे उल्लेखित केले. मानवी जीवनावर मोबाईलचा अत्यंत विघातक परिणाम होत असून लहान बालके ही मोबाईलच्या चक्रविवाद अडकलेली दिसत आहेत याचे दूरगामी परिणाम भविष्यात आणखीही विघातक होतील असे त्यांनी सांगितले. मोबाईलच्या योग्य वापरासाठी तो फायद्याचाही आहे. पण प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक वर्तनावर ते अवलंबून आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. व्ही आर खडसे यांनी केले. सूत्रसंचालन रोहिणी पाटील आणि आभार प्रदर्शन तेजस्विनी चौधरी यांनी केले या कार्यक्रमासाठी विभागातील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे यांचे मार्गदर्शन लाभले.