मोबाईलवर बोलणे पडले महागात ; रेल्वेखाली येऊन एकाचा मृत्यू

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ आज 2 जानेवारी रोजी सकाळी 9.45 वाजता अपलाईनवर सचखंड एक्स्प्रेसखाली येवून एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला आहे. रेल्वे रुळामधून मोबाईलवर बोलत हा तरुण जात असतांना ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास खंबा क्रमांक 419/2 दरम्यान मुुंबईकडे जात असलेल्या सचखंड एक्स्प्रेसच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेत तरुणाचे शरीराचे दोन तुकडे झाले आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस सहाय्यक फौजदार राजेश पुराणिक यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तरुणाजवळ कुठलेही कागदपत्रे नसल्याने त्याची ओळख पटलेली नाही. तरुणाचे अंदाजे वय ३० ते ३२ वर्ष असून त्याच्या अंगात लाल शर्ट व तपगिरी रंगाची पॅन्ट असे त्याचे वर्णन आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेश पुराणिक हे करीत आहेत. ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

Protected Content