वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव ट्रकने मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील टहाकडी गावाजवळ घडली आहे. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्या ट्रकचालकावर गुन्हा दखल करण्यात आला आहे.
वरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक सुरेश भालशंकर (वय-३०) रा. मेळसांगवे ता. मुक्ताईनगर हा तरूण आपल्या आई युमुनाबाई सुरेश भालशंकर (वय-५०) यांच्यासोबत मोपेड गाडीने शुक्रवारी २ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथून तासखेडा ता. रावेर येथे जात असतांना भुसावळ तालुक्यातील टहाकडी गावाजवळ समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक (पीबी ०७ एएस ५७३८) याने धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या यमुनाबाई भालशंकर या महिला रस्त्यावर पडल्या त्यात त्यांच्या उजव्या हातावरून ट्रकचे चाक गेल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी दिपक भालशंकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रक चालक सुभेन्द जगन्नाथ दास रा. होशियारपूर, पंजाब याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नरसिंग चव्हाण करीत आहे.