मोदी सरकारने सामान्यांच्या घराचंही बजेट बिघडवलं – राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मोदी सरकारने देशासह सर्वसामान्यांच्या घराचंही बजेट बिघडवलं, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरुन महागाईसंदर्भात एक बातमी शेअर करत राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

राहुल गांधी म्हणाले, “केंद्रीय बजेटच्या महागाईमुळे घरगुती एलपीजी सिलींडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मोदी सरकारने देशाचं आणि घराचं दोन्हींचं बजेट बिघडवलं आहे” राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षानं केंद्रीय बजेटवरुन वारंवार भाजपावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, केंद्राचं बजेट म्हणजे शेतकरी कायद्यांनंतर सरकारनं शेतकऱ्यांवर केलेला आणखी एक हल्ला आहे, असं राहुल गांधी यांनी शुक्रवारी म्हटलं होतं. पेट्रोल-डिझेलवर या शेतकऱ्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे. मात्र, त्यांना कुठलाही मदतीचा हात सरकारने दिलेला नाही, असंही ते म्हणाले होते.

Protected Content