मोदी सरकारच्या ७ व्या वर्षपूर्तीनिमित्त शहरात विविध उपक्रम (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या आघाडीच्या केंद्र सरकारच्या  ७ व्या वर्षपूर्तीनिमित्ताने सेवाकार्य करून शहरातील ९ मंडलात  साजरा करण्यात आला. 

 

शहरातील ९ मांडलात म्युकॉर माईकोसिस (ब्लैक फंगस) आजार तपासणी, मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, रक्तदान, कोरोना अॅटीजन तपासणी शिबिर, वृक्षारोपण, किराणा कीट वाटप या माध्यमातून  नरेंद्र मोदी सरकारच्या ७ व्या वर्षपूर्ती कार्यक्रम घेण्यात आलेत. “म्युकॉर माईकोसिस (ब्लैक फंगस) हा Post-Covid, व मधुमेह रुग्णांसाठी २-३ महीन्यात होण्याची शक्यता जास्त असते त्यानुसार आज दि. ३०  मे रोजी  सृष्टि हॉस्पिटल येथे भाजपा मंडल-४ येथे  निशुल्क चेकअप कॅम्प मुखरोग तज्ञ  डॉ. गोविंद मंत्री,  नाक,कान,घसा तज्ञडॉ अक्षय सरोदे, यांचे  मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा महानगर अध्यक्ष  दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, यांच्या हस्ते जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, भगतसिंह निकम, नगरसेवक अमित काळे, प्रसिद्धीप्रमुख मनोज भंडारकर, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, धीरज वर्मा मंडळ सरचिटणीस, प्रमोद वाणी, प्रल्हाद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तपासणी शिबिराची सुरुवात करण्यात आली. नाक, कान, घसा तज्ञ डॉक्टर श्री अक्षय सरोदे व दंत-मुखरोग तज्ञ डॉक्टर गोविंद मंत्री यांनी श्री राधेश्याम चौधरी यांच्या सृष्टी हॉस्पिटल येथे पोस्ट-कोविड  रूग्णांना म्युकॉर मायकोसिस संबंधी जनजागृतिपर मार्गदर्शन केले. नंतर रूग्णांची मोफत तपासणी करून खबरदारीसाठीचे उपायही सुचवले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/341119230744880

 

Protected Content