मोदी सरकारच्या बेफिकिरीवर महाराष्ट्र काँग्रेसची टीका

 

मुंबई : वृत्तसंस्था । इतरही लसींना मान्यता द्यावी” हा सल्ला राहुल गांधींनी आधीच दिला होता. लसीअभावी लसीकरण केंद्र बंद करायची वेळ आल्यावर मोदी सरकारने इतर लसींना मान्यता दिली. हा निर्णय आधीच घेतला असता तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते!” असं महाराष्ट्र काँग्रसेने ट्विटद्वारे म्हटलं आहे.

 

 

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नवीन बाधित आढळून येत आहे.रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. सरकारकडून संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांमध्ये जागृती, कडक निर्बंध, लॉकडाउनसह वैद्यकीय यंत्रणा अधिक गतीमान व बळकट करण्याचे काम सुरू आहे.तरी देखील प्रादुर्भाव वाढतच आहे. अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर्ससह मेडिकल ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन व लसींचा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

 

याचबरोबर उशिरा का होईना मोदी सरकारला अक्कल आली! असा टोला देखील लगावला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विटमध्ये एकीकडे राहुल गांधी यांनी ८ एप्रिल रोजीच, मापदंडानुसार परदेशी लसींना त्वरित मान्यता दिली जावी, असं केंद्र सरकारला सांगितलं होतं असं दर्शवलं आहे. तर दुसरीकडे १३ एप्रिल रोजी मोदी सरकारने परदेशी लसींना मान्यता दिल्याचं दाखवलं आहे.

 

Protected Content