सावदा ता.रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोठा वाघोदा येथील रावेर रोडवरील कब्रस्तानात ग्रामपंचायत च्या १५ वा वित्त निधीतून कुपनलिका (ट्युबवेल) ला भरमसाठ पाणी लागले असून हजरत पिर बालेशाह बाबा यांच्या दर्गा शेजारी पायथ्याशी भरपूर पाणी लागल्याने मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायत प्रशासनाने दफनभूमीसाठी केलेल्या स्तुत्यपुर्ण उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
ग्रामपंचायतीचे सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी, ग्रामविकास अधिकारी गणेश सुरवाडकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी, योगिराज महाजन, संजय माळी, उदय पाटील, भुषण चौधरी, अमोल वाघ, अमीनाबाई तडवी, सुमनबाई कापसे, हर्षा पाटील, मिनाक्षी पाटील, संगिता पवार. हाजराबी पिंजारी, साधनाबाई महाजन, प्रमिला भालेराव, भाग्यश्री वाघ आदींनी परिश्रम घेतले आणि १५ वा वित्त आयोगाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता निधीतून कुपनलिका ट्युबवेल करण्याचे काम मासिक सभेत मंजूर केले. पुर्णत्वास ही आणलेबद्दल मोठा वाघोदा ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल मोठा वाघोदा वासियांतर्फे समाधान व्यक्त केले जात आहे.