मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा १२४ वर पोहचला आहे. मात्र पुणे शहर आणि तालुक्यात गेल्या ४८ तासात एकही नवा रूग्ण आढळून आला नाही. यामुळे नागरीक आणि वैद्यकिय अधिकारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा आता १२४ वर गेला आहे. आज नव्याने मुंबई आणि ठाण्यात करोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहे. काल मुंबईत १० आणि सांगलीत एकाच कुटुंबातील ५ रुग्ण आढळल्याने हा आकडा १२२ वर गेला होता. आज दोन रूग्णांची भर पडल्याने १२४ पर्यंत झाला आहे. त्यात मुंबईत सर्वाधिक ५२ तर पुण्यातील १९ रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये १२ आणि सांगलीत ९ रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभे राहिले आहे. लोकांनी गर्दी करू नये आणि एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सिद्धिविनायकाचा आधार; जेवण व पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहे.