मोटारर्सची डिलरशीप देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कीया मोटारर्सची डिलरशिप देण्याच्या नावाखाली रावेर तालुक्यातील एका व्यावसायिकाची तब्बल ५ लाख ५० हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय एकनाथ पाटील (वय-५९) रा. मोरगांव खुर्द ता. रावेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. २२ मार्च २०२३ रोजी त्यांना अशोक पांडे  आणि धरणीधर पाटील नावाच्या दोन व्यक्तींचा फोन आला. कीया मोटारर्सची बऱ्हाणपूर येथे डीलशरशीप देण्याचे आमिष दाखविले. विजय पाटील यांचा विश्वास संपादन करून दोघांनी वेळोवेळी आरटीजीएस च्या माध्यमातून तब्बल ५ लाख ५० हजार रूपये स्वीकारले. त्यानंतर डिलरशीप देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजय पाटील यांनी सोमवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अशोक पांडे  आणि धरणीधर पाटील असे नाव सांगणारे अनोळखी व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहे.

Protected Content