चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील मेहूणबारे येथे खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेला रस्त्यावर काहींनी अतिक्रमण केल्याने सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहेत.
तालुक्यातील मेहूणबारे येथे खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून नवेगांव शेत शिवारापासून तर पळासरे गावापर्यंतचा रस्ता बांधण्यात आलेला आहे. या रस्त्याने मेहूणबारे, कढरे, तिरपोळे, खडकी, पळासरे व इतर ठिकाणच्या शेतकरी या रस्त्याचे वापर करीत असतात. दळणवळणाचा हाच रस्ता असल्याने अवजड वाहनांबरोबर शेतकऱ्यांचे येणे -जाणेही येथूनच आहेत. मात्र काही जणांनी ह्या रस्त्यावर अतिक्रमण केले असून रस्त्यावर चमेलीचे झाडे, काटे व दगड टाकून रस्त्यावरून जाणाऱ्यांची अडवणूक केली आहेत. त्याचबरोबर गटारी ह्या बुजून टाकण्यात आले असून शेतातील पाणी हा रस्त्यावर सोडण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने याचा मनस्ताप त्यांना करावा लागत आहेत. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय बाबुलाल गढरी यांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यात त्यांना अपयश आले. या समस्येला घेऊन सर्व शेतकरी त्रस्त असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढे येत तहसीलदार अमोल मोरे यांना याबाबतचा निवेदन शुक्रवार रोजी देण्यात आले. हि मागणी जर पूर्ण करण्यात आली नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहेत.
यावेळी संभाजी सेना जिल्हा उपाध्यक्ष सुरेश संतोष पाटील, धनगर समाज सेवा संस्था, राष्ट्रीय समाज पक्ष ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्योतीताई निकम, भारतीय जनता पार्टीचे तालुका जेष्ठ ग्रामीण माजी सरचिटणीस संजय निकम आदींनी पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी राष्ट्रीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सोमनाथ बोराडे, जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष आर.के.पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय गढरी, जिल्हा सरचिटणीस एन.के. पाटील आदी उपस्थित होते.