मेहरून येथे तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण:

जळगाव शहरातील मेहरून परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाला अश्लील शिवीगाळ करून चापटाबूक्कयाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवार 24 मार्च रोजी रात्री 9 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश मधुकर मोरे (वय-21, रा. मेहरून, जळगाव) हा तरुण हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी 24 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता त्याच्या घरासमोर राहणारा अमजद खान याने कोंबडीचा खुराडा मागितला. त्यानंतर राकेश मोरे यांनी कोंबडीचा खुराडा देण्यास उशीर केला. या कारणावरून अमजद खान याने राकेश मोरे याला अश्लील शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी बेदा मारहाण केली. यामध्ये राकेशला दुखापत झाली. दरम्यान राकेशने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री 9 वाजता संशयित आरोपी अमजद खान रा. मेहरून याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Protected Content