जळगाव : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा शहरातील मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली़ अभिषेक नंदलाल मौर्या (२८, रा़ मंगलपूरी महाराज नगर, रामेश्वर कॉलनी) असे मयताचे नाव आहे़ याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे़
अभिषेक मौर्या हा रामेश्वर कॉलनीतील मंगलपूरी महाराज नगरात पत्नी, मुलगा आणि मुलीसह वास्तव्यास होता़ शहरातील भारत गॅस येथे कंत्राटी पध्दतीने काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा़ सोमवारी सायंकाळी अभिषेक हा तीन मित्रांसोबत मेहरूण तलाव येथे पोहण्यासाठी गेला होता़ तलावात पोहत असताना अचानक तो बुडायला लागला़ हा प्रकार कळताच मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्याला वाचविण्यात अपयश आले़ काहीवेळानंतर अभिषेक याचा बुडून मृत्यू झाला़. माहिती कळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, आसीम तडवी, सचिन पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र शेजवळ, सलमान खान युसूफ खान, किरण नाईक, भूषण तायडे, रामदास भोस, नीलेश पाटील या पट्टीच्या पोहणाºयांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले़ काही वेळानंतर मृतदेह आढळला. त्यानंतर तो बाहेर काढण्यात आला़
मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़