जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण तलावाजवळ दुचाकीने जाणाऱ्या दोघांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दोघे जण जखमी झाल्याची घटना जवळील श्रीकृष्णा लॉनजवळ ४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, निसार शेख इसाक खाटीक (वय-३६) रा. गुलाबबाबा कॉलनी मेहरूण रोड आणि रिझवान सैय्यद असे दोघेजण दुचाकी (एमएच १९ डीएल ९३४०) ने मेहरूण तलावावर फिरण्यासाठी ४ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गेले. १२.१५ वाजेच्या सुमारास समोरून (एमएच १९ बीएच ६०७३) वरील अज्ञात वाहनावर ट्रिपल सिट असलेल्या दुचाकीधारकाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील निसार शेख आणि रिझवान सैय्यद हे दुचाकीवरून खाली पडल्याने जखमी झाले. तर दुचाकीवरी तिघे दुचाकीवर बसून पसार झाले होते. याप्रकरणी निसार खाटीक यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.