जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरील एक मेडीकल दुकान फोडून ५ ते ६ हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना मंगळवारी १६ मे रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान संपूर्ण घडणारी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
फरदीन शेख यांचे जिल्हा रुग्णालयाच्या गेट क्रमांक ३ समोर एस. एन. फार्मा हे मेडिकल औषधांचे दुकान आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी दुकान सुरू केले आहे. सोमवारी दिनांक १५ मे रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानाच्या शेजारी राहणाऱ्या जागेच्या मालकाने फरदीन शेख यांना फोन करून दुकानाचे शटर वाकलेले अवस्थेत असल्याची माहिती दिली.
त्यामुळे फरदीन शेख हे तातडीने दुकानाकडे आले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. दरम्यान चोरीची घटना पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. त्यामध्ये संशयित चोरटे दुकानाचे शटर वाकवून आत मध्ये शिरताना व चोरी करताना तसेच बाहेर जाताना दिसत आहे. त्यावरून चोरटे हे सराईत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. फरदीन शेख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.