मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला

 

शिलॉंग : वृत्तसंस्था । मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला चढवल्याने शिलाँग आणि मेघालयच्या काही भागातली परिस्थिती चांगलीच चिघळली आहे.

 

आत्तापर्यंत कोणतीही हानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली तर शिलाँगच्या काही भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्याचबरोबर चार जिल्ह्यांमधील इंटरनेट सुविधाही बंद करण्यात आली आहे.

 

मेघालयमध्ये आत्मसमर्पण करणारा एक दहशतवादी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. या घटनेनंतर मेघालयमध्ये काल जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तणावाचं वातावरण असून शिलाँगमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर चार जिल्ह्यांमधील इंटरनेट सुविधा ४८ तासांसाठी बंद करण्यात आली आहे. चेरिस्टल फिल थांक्यू या दहशतवाद्याचा १३ ऑगस्टला पोलीस चकमकीत मृत्यू झाला. काल त्याच्या पार्थिवाचं दफन झाल्यानंतर ही हिंसा भडकली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मेघालयचे गृहमंत्री लहकमान रिंबुई यांनी राजीनामा दिला आहे.

 

Protected Content