नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी ट्विट करत देश आता स्वावलंबी भारत अॅप इनोव्हेशन चॅलेन्ड लॉन्च करत असल्याचे म्हटले आहे.
नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, जर तुमच्याकडे असे एकादे प्रोडक्ट असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे काही चांगले काही करण्याचा दृष्टीकोन आणि क्षमता आहे, तर मग तुम्ही टेक कम्युनिटीला नक्कीच जोडले जाईल, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. चीनच्या कारवायाना उत्तर देण्यासाठी भारत सरकारने ५९ चीनी अॅप बॅन तर केलेच, परंतु आता एक पाऊल पुढे टाकत भारताला अॅप निर्मितीत स्वावलंबी बनवण्याची योजना तयार करणे सुरू केले आहे. ट्विटमध्ये देश आता स्वावलंबी भारत अॅप इनोव्हेशन चॅलेन्ड लॉन्च करत असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. आज मेड इन इंडिया अॅप तयार करण्यासाठी तांत्रिक आणि स्टार्टअप समुदायामध्ये मोठा उत्साह आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. या मुळे @GoI_MeitY आणि @AIMtoInnovate हे संयुक्तपणे इनोव्हेशन चॅलेंज सुरू करत आहेत असे मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी लिंक्डइनवर आपले हे विचार मांडले आहेत.