जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित मू.जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग आणि संस्कृत भारती बेंगलुरु व ककासंवि नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ मे ते १० मे २१०९ या कालावधीत होणाऱ्या पाच दिवसीय सरळ संस्कृत संभाषण कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांच्याहस्ते संपन्न झाले.
विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची गोडी निर्माण व्हावी तसेच भाषेचे पायाभूत ज्ञान मिळावे. हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. या वेळी प्राचार्य बोलतांना म्हणाले की, संस्कृत ही जागतिक आणि संगणकाची भाषा असून या भाषेचे पायाभूत ज्ञान सर्वाना येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेत नागपूर येथील प्रा. लोकेश मेहता आणि मनिष शिरभे हे तीन सत्रा मध्ये पाचदिवस मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेचे प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख प्रा. डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. किशोरी गव्हाले हिने केले. या कार्यशाळेत जळगाव जिल्हा व जिल्याबाहेरील ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.