जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी।
मु. जे. महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पुढाकाराने विजयोत्सव मेळाव्याचे आयोजन रविवार २५ जून २०२३ रोजी करण्यात आले होते.
हा मेळावा महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस व ऑल इंडिया नॉन टीचिंग असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर आर. बी. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सं. ना. भारंबे सर यांनी भूषविले.
कार्यक्रमास रमेशअप्पा पाटील, महासंघ उपाध्यक्ष; श्री. माधव राऊळ, महासंघाचे सरचिटणीस; श्री. अनिल लबरे, महासंघाचे खजिनदार; श्री. सुदामजी मोगल, अमरावती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष; श्री. दिलीप पवार सर, महासंघाचे सरचिटणीस; मा. जी. वाय. पाटील, जळगाव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तर डॉ. ऋषीकेश चित्तम, जळगाव जिल्हा संघटनेचे सरचिटणीस उपस्थित होते. याशिवाय नंदुरबार जिल्हा संघटना अध्यक्ष श्री. मनीष कलाल यांचीही उपस्थिती होती. यावेळी श्री. व्हि. टी. जोशी यांची विद्यापीठ अधिकार मंडळात अधिसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल, डॉ. ऋषीकेश चित्तम यांची विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून तर श्री. रमेश अप्पा पाटील यांची जळगाव जिल्हा दुध संघावर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल मु. जे. महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि विभागीय संघटनेमार्फत विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मंचावर उपस्थित महाविद्यालाचे कुलसचिव डॉ. जगदीप बोरसे आणि मु. जे. महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री.साधू तागड यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना श्री. आर. बी. सिंह यांनी आपल्या कारकिर्दीतील काही अनुभव कथन केले तर संघटनेचे कार्य करतांना कशाप्रकारे औचीत्त्य ठेवले पाहिजे याबाबतही मार्गदर्शन केले. तसेच कर्मचा-यांच्या मागण्या जाणून घेणे व त्यानुसार अभ्यासपूर्वक टिपणी करून ती शासन दरबारी मांडणे व त्यानुसार कर्मचा-यांना लाभ मिळवून देणे यासाठी करावयाच्या धडपडीविषयी आपले अनुभव कथन केले. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी भविष्यात लागू होणा-या १०-२०-३० लाभांची योजना, जुनी पेन्शन योजना, शिक्षकेतर कर्मचा-यांनी पी.एच. डी पदवी प्राप्त केल्यास त्यांना अतिरिक्त लाभ मिळवून देणे, महाविद्यालयांमध्ये नवीन पदभरतीबाबत तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांनाही शिक्षकांप्रमाणे यु.जी.सी. स्कीम लागू करणे अशा विविध महत्वाच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. शिक्षकेतर कर्मचा-यांच्या विविध मागण्या व अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन करून सन २०२३ अखेर महत्वाचे सर्व विषय मार्गी लागतील असे आश्वासन यावेळेस त्यांनी उपस्थीतांना दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ. जगदीप बोरसे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. राजेश बागुल यांनी केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष श्री. गणेश सोनार, मेळावा समितीचे श्री. सुभाष तळेले, श्री. संदीप गोसावी, श्री. संजीव झोपे, श्री. नितीन पाटील, श्री. हेमराज पाटील, श्री. संतोष मनुरे, श्री. दिलीप येवले, श्री. दत्तात्रय कापुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांनी मोलाचे सहकार्य केले. अशा प्रकारच्या शिक्षकेतर कर्मचा-यांसाठीच्या मेळाव्याचे आयोजन ३० वर्षानंतर होत असल्याचे सर्व उपस्थितांनी आवर्जून सांगितले व मू. जे. महाविद्यालयाने पुढाकार घेऊन अशा मेळाव्याचे आयोजन केल्याने समाधान व्यक्त केले.