जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालय येथे दि. 30 ऑक्टोबर 2022 रविवार रोजी ‘तेज गंधर्व’ शास्त्रीय गायन राज्य स्तरीय स्पर्धेचे आयोजन कान्ह ललित कला केंद्र संगीत विभागातर्फे करण्यात आले होते.
स्व.तेजस नाईक स्मरणार्थ हि स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेमध्ये लहान व मोठा गटात तब्बल 45 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष मू.जे.महाविद्यालय प्राचार्य संजय भारंबे , सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, मिलन भामरे, नितीन नाईक व सुवर्णा नाईक, परीक्षक पं. विश्वनाथ दाशरथे औरंगाबाद आणि प्रमोद गणोरकर पुणे उपस्थीत होते.
लहान गट प्रथम पारितोषिक शंकर महाजन, द्वितीय पारितोषिक चैताली पाटील, तृतीय पारितोषिक वरद ठाकूर ,उत्तेजनार्थ अमोघी कुलकर्णी तर मोठ्या गटात प्रथम पारितोषिक सोनी जॉर्ज ,द्वितीय पारितोषिक आलापिती पांडे ,तृतीय पारितोषिक सौरभ गावंडे ,उत्तेजनार्थ रोहित पांचाळ यांना मिळाले. या स्पर्धेचे परीक्षण पं. विश्वनाथ दाशरथ, औरंगाबाद आणि प्रमोद गणोरकर, पुणे यांनी केले. पारितोषिक वितरण पं.संजय पत्की याच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.ईशा पांडे यांनी केले. शेवटी संगीत विभाग प्रमुख प्रा.कपिल शिंगाणे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.देवेंद्र गुरव व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.