मूकबधिर व मतिमंद विद्यालयाचे संस्थाध्यक्ष पाटील यांचा जन्मदिनानिमित्त अनोखा उपक्रम

धरणगाव, प्रतिनिधी | धरणगाव येथे जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष आर. डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त के. जी. गुजराथी मूकबधिर, मतिमंद निवासी-अनिवासी विद्यालयाच्या वतीने अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी, आर. डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त के. जी. गुजराथी संस्थेच्या माध्यमातून शिक्षकवृंदांनी कोविड १९ च्या शासन निर्णयानुसार विद्यालये बंद असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मूकबधिर, मतिमंद विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शालेय साहित्याबरोबर तांदूळ वाटप केले. तसेच, वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना फळं व बिस्किटे वाटप करण्यात आली.  यावेळी आर. डी. पाटील म्हणाले की, माझा वाढदिवसप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या आधार देण्याचा अनोखा अश्या स्तुत्य उपक्रमाचे मी सर्वांचे कौतुक करून अभिनंदन करतो. मी सर्वांचे धन्यवाद व आभार न मानता. मी ऋणात राहणे पसंत करतो असे संस्थाध्यक्ष श्री पाटील म्हणाले. यावेळी मूकबधिर, मतिमंद शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केक कापून वाढदिवस साजरा करतांना आर. डी. पाटील व विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य, तांदूळ, वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना फळं वाटत करताना मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव व विशेष शिक्षक आर.एच.पाटील, नंदकुमार पाटील, दिपकराव जाधव, संतोष भडांगे, किशोर पाटील, चंद्रराव सैंदाने, राकेश पाटील, अनंत जाधव, दिलीप पाटील, उमेश पाटील, सौ.कल्पनाताई ठाकरे, आरिफ शहा, राकेश पाटील,अमोल पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content