जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मु.जे महाविद्यालयाच्या २५० मुलांसाठी असलेल्या ४० खोल्यांचे भव्य वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे सोमवार १० एप्रिल रोजी भूमिपूजन करण्यात आले.
आपण समाजाचे काही देणे लागतो समाजातल्या प्रत्येक घटकांशी आपला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दररोज संबंध येत असतो. या हेतूने आपणसुद्धा परतफेड केली पाहिजे. असाच विचार आणि आदर्श आचरणात आणत समाजातील प्रतिष्ठित नागरिक वसंत किसन राणे यांनी त्यांच्या मातोश्री गोदावरी किसन राणे यांच्या नावे मुलांच्या नवीन वसतीगृहासाठी देणगी दिली आहे. या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा सोमवार १० एप्रिल रोजी मु.जे महाविद्यालयाच्या मुलांच्या वसती गृहाजवळ देणगीदार वसंत किसन राणे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला.
या भूमिपूजन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी.टी. पाटील, सचिव एस. एस. फालक, सहसचिव पी. एन. पाटील, व्यवस्थापन मंडळ सदस्य हरिषभाई मिलवानी, सुधीर बेंडाळे, मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, आर्किटेक्ट् अभिजित महाजन, कुलसचिव जगदीप बोरसे, रेक्टर संजीव पाटील, पंकज खासबागे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.