मुलांप्रमाणे मुलींना समान अधिकार द्या : साध्वी सपना दीदी (व्हिडिओ)

जामनेर भानुदास चव्हाण  | म्हातारपणात मुलीच आई-वडिलांना आसरा देतात हे वास्तव्य असून मुलाप्रमाणेच मुलींना सुद्धा सारखे अधिकार आपण दिले पाहिजे असे मत फर्दापूर आश्रम ट्रस्टच्या साध्वी सपना दीदी यांनी व्यक्त केले. त्या गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

 

जामनेर तालुक्यातील गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टमध्ये गेल्या आठ वर्षापासून कन्या भोजन व पूजन कार्यक्रम आयोजन करीत आहे. सालाबादाप्रमाणे या वर्षी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे संचालक श्याम चैतन्य महाराज व फर्दापूर ट्रस्टच्या साध्वी सपना दीदी यांच्या हस्ते कन्या पूजन करण्यात आली. यावेळी कुमारिका कन्यांना गोड गोड भोजनाचा आस्वाद देण्यात आला. यावेळी कुमारिकांना तहसीलदार अरुण शेवाळे यांच्यातर्फे वही व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला श्याम चैतन्य महाराज यांचे मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा करतो त्याचप्रमाणे मुली व महिलांना सन्मान दिला पाहिजे. सोशल मिडियामुळे आजची पिढी सुसंस्कृत होत नसून आपल्या मुला-मुलींना आपण चांगले संस्कार देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचबरोबर हुंडा सारख्या प्रथा बंद केले पाहिजे असे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला साध्वी सपना दीदी, तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक अरुण राठोड, सहाय्यक फौजदार जयसिंग राठोड, रवी महाजन, प्रविण राजनकर, संजय राठोड, राजेश नाईक, गोकुळ चव्हाण, निलेश चव्हाण यांच्यासह गुरुदेव सेवा आश्रम फास्ट संचालक व भक्तगण उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/410855537312605

 

Protected Content