जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, वसिम उर्फ दारा फारूख खाटीक (वय-१९) रा. नशेमन कॉलनी, शिरसोली ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता दोन लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून गावातील आठ ते दहा जणांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर त्याच्या सोबत असलेला इरफान शहा शकील शहा या दोघांना करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वसीम उर्फ दारा फारूख खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंदन रामकृष्ण महाजन, योगेश निवृत्ती पानघडे, पप्पू दिगा बोबडे, योगेश अशोक फुलवाडे, सौरव अनिल पाटील, विवेक ज्ञानेश्वर फुलवाडे, कृष्णा सुरेश बारी, नरेंद्र उर्फ नानु रवी बारी, मुकेश शिवाजी बारी, अजय विजय भिल सर्व रा. शिरसोली ता.जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.