श्रीनगर: वृत्तसंस्था । जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानी पीपल्स अलायन्स फॉर डिक्लरेशची बैठक होत आहे या बैठकीत पीपल्स अलायन्स फॉर डिक्लसेशचे अध्यक्ष पद आणि इतर पदे घोषित केली जातील नंतरच डिक्लरेशनची पुढील रणनीती ठरवली जाईल.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांना डिक्लरेशनचे अध्यक्षपद देण्यात येईल मेहबूबा मुफ्ती आणि सज्जाद गनी यांना देखील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येतील. आतापर्यंत हा गट पदाविना सुरू होता. आता या गटाचे अध्यक्षपद, उपाध्यक्ष पद, सरचिटणीस आणि इतर पदांची घोषणा केली जाईल. या व्यतिरिक्त या बैठकीत येणाऱ्या दिवसांमध्ये रणनीतीबाबत पूर्ण रुपरेषा तयार केली जाणार आहे.
या महिन्याच्या १५ तारखेला या गटाची फारूख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीत मेहबूबा मुफ्ती यांनी पहिल्यांदाच भाग घेतला होता. त्यानंतर या गटाची आज बैठक होत आहे.
जम्मू काश्मीर आणि लडाखला पुन्हा पूर्वीसारखाच विशेष दर्जा मिळावा यासाठी गुपकार डिक्लरेशन केले गेले होते. मागील बैठकीत या सर्वपक्षीय बैठकीत या गटाला पीपल्स अलायन्स फॉर डिक्लरेशन असे नाव देण्यात आले. या गटातील सर्व नेते जम्मू आणि काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा देण्याची मागणी प्रदेशात करत आहेत.