दिल्ली वृत्तसंस्था । कोरानामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत फटका बसलेल्या देशभरातील १५ हजार कुटुंबांना मुथूट ग्रुपच्या वतीने अन्न, अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू मोफत दिले जात आहे.
कंपनीने भारतभर उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा या राज्यांमध्ये या उपक्रमाचे आयोजन केले होते. या कुटुंबांना मोफत अन्न देण्याबरोबरच, कंपनीने राज्य सरकारने आयोजित केलेल्या कम्युनिटी किचनसाठीही मदत केली. कंपनीने आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना मास्क, ग्लोव्ह व सॅनटायझर अश्या वस्तूंचे वाटपही करण्यात आले आहे.
केंद्रीय पद्धतीने अन्नधान्य संपादित करण्यात आले आणि काळजीपूर्वक पॅक करण्यात आले. त्यानंतर, 3 ते 5 दिवसांच्या कालावधीत या जिल्ह्यांतील सर्वाधिक गरजू व बाधित कुटुंबांना ही पाकिटे देण्यात आली. संपादन, पॅकेजिंग व वितरण करत असताना जास्तीत जास्त निगा व वैयक्तिक स्वच्छता राखण्यात आली.