रावेर, प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (दि.१५) जिल्हा दौऱ्यावर असताना रावेर तालुक्यात प्रमुख कार्यालयातील शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या खाजगी कामा निमित्ताने गायब असल्याचे आढळून आले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी नुकताच शासकीय कर्मचा-यांसाठी पाच दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयाला प्रशासकीय अधिकारीच हरताळ फासत असून सतत गायब असतात. त्यामुळे याबाबत नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे.
आधीच सर्व साधारण नागरीकांची कामे थंड बस्त्याने असतात, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह डझनभर मंत्री जिल्हात आहेत. शेजारील मुक्ताई नगर मतदार संघात आहेत. परंतु इकडे रावेर तालुक्यातील कार्यालये मात्र ओस पडलेली आहेत. येथील प्रशासकीय कार्यालयांची आमच्या स्थानिक प्रतिनिधीनीं रिअॅलिटी चेक केले असता. पंचायत समिती,सार्वजनिक बांधकाम विभाग,जलसंधारण विभाग, कृषी विभाग, एकात्मक बालविकास विभाग, गट शिक्षण विभागआदी कार्यालयामध्ये सामसुम होती तर काही ईमानदारीने काम करणारे कर्मचारी उपस्थित होते. अनेक ठिकाणचे अधिकारी कर्मचारी गायब होते, यामुळे सर्वसाधारण नागरीकांमधून संताप व्यक्त होत होता. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन करण्याची मागणी होत आहे. महसूल विभाग, पोलिस प्रशासन, वन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी कार्यालयात उपस्थित होते.