जळगाव प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हेलीकॉप्टरने जैन हिल्स हेलिपॅड येथे आज दुपारी 1 वाजता आगमन झाले आहे. यावेळी महापौर भारतीताई सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. बी. एन. पाटील आदिंनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आज दुपारी जैन हिल्स येथे पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत होत आहे. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. दुपारी साडेतीन वाजात मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नाशिककडे रवाना होणार आहे.