नवी दिल्ली । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज दिल्ली दौर्यावर जाणार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एका ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दिल्ली दौर्याची माहिती दिली आहे. यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदींना भेटतील तर सायंकाळी ६ वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
महाविकास आघीडीतील समन्वय राखण्याासाठी उद्धव ठाकरे सोनिया गांधीची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे आंनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेत त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र त्या शपथविधीस आल्या नव्हत्या. या पार्श्वभूमिवर, उध्दव ठाकरे यांच्या दौर्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.