मुक्ताईनगर शहरामध्ये ओला व सुका कचऱ्याचा वाजतोय बोजवारा (व्हिडिओ)

मुक्ताईनगर- पंकज कपले | नगरपंचायतीच्या घंटागाडी प्रत्येक प्रभागात नागरिकांकडून ओला व सुका विलगीकरण करून कचरा संकलित करण्यात्त येतो. परंतु, या कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंडवर विलगीकरण करण्यात येत नसल्याने नागरिकांकडूनच विलगीकरणाचा आग्रह का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

 

नगर पंचायत नागरिकांकडून ओला कचरा व सुका कचरा याची विलगीकरण करत आहे. परंतु, या कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंडला जाऊन ओला कचरा सुका कचरा प्लास्टिक असो लोखंड असो असा कुठलाही प्रकारचा डम्पिंग ग्राउंडला विलगीकरण होताना दिसून येत नसल्याने घंटागाडीमध्ये विलगीकरणाचा आग्रह का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. या विलगीकरणातून नगरपंचायतीला जो फायदा होणार आहे तो फायदा होताना दिसून येत नाही. या कचऱ्यामध्ये शेतासाठी लागणारे खत तयार होत असते, प्लास्टिक वेगळे निघाले म्हणजे प्लास्टिक पासून पैसा निर्माण होत असतो. भंगार लोखंड यापासून सुद्धा नगरपंचायतीला पैसा उपलब्ध होऊ शकतो. परंतु, असा कुठल्याही प्रकारचा उत्पन्न नगरपंचायतीला याबाबत होताना दिसून येत नाही. लाखो रुपयाचे नुकसान नगरपंचायत यामध्ये करताना दिसून येत आहे. मागील काही वर्षांमध्ये नगरपंचायतीने स्वच्छ भारत सुंदर भारत या संदर्भात ७५ लाख रुपये हे बक्षीस  मिळविले. परंतु, हे बक्षीस का फक्त कागदोपत्री होते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बहुतांश ओला कचरा अथवा सुका कचरा हा जवळच असलेल्या स्मशानभूमीच्य खड्ड्यामध्ये कोंबण्यात आलेला आहे तो कचरा त्या खड्ड्यामध्ये का कोंबण्यात आला याबाबतही नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/486377162986508

 

Protected Content