Home धर्म-समाज मुक्ताईनगर येथे हनुमान जयंतीनिमित्त गरजू व रूग्णांना जेवन वाटप

मुक्ताईनगर येथे हनुमान जयंतीनिमित्त गरजू व रूग्णांना जेवन वाटप


मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील समाज कार्यात सतत पुढे असणाऱ्या वंदे मातरम गृपच्या तरुण सदस्यांनी पुढाकार घेत आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने परप्रांतीय त्याचप्रमाणे शहरातील गरजू लोकांना शहरात फिरुन अन्नदान केले. यावेळी ग्रामीण रूग्णालयातही रूग्णांना जेवन वाटप करण्यात आले.

नुतन मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विरेंद्र भोईटे यांच्या सहकार्याने आज हनुमान जयंतीनिमित्त अन्नदान वाटप करण्यात आले. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज रुग्णालयांत रुग्णांना खिर, पुरी मोतीचूराचे लाडू, गंगाफळाची भाजी असे पदार्थ असलेले जेवण देण्यात आले.

यावेळी तहसीलदार श्याम वाडकर, नायब तहसीलदार प्रदिप झांबरे, पो.नि. सुरेश शिंदे, डॉ.योगेश राणे, शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई, प्रदिप काळे यांनी स्वतः जेवण वाढले. भिला वाणी व त्यांच्या परिवाराने कोणत्याही मोबदला न घेता गरजु करिता रुचकर आणि स्वादिष्ट जेवण हे तयार करून दिले. या सामाजिक कार्यात मुक्ताईनगर येथील वंदे मातरम गृपच्या सदस्यांचे मोठे योगदान होते. वंदे मातरम गृपचे धनंजय सापधरे, संजय कपले, भिला वाणी, शुभम तळेले, राहुल शुरपाटणे, अमरदिप पाटील, सुमित बोदडे, विश्वनाथ घुले, भिकन शेख, शंकर बोराखेडे, दिपक खेवलकर, सुनिल सुरपाटने, विशाल देशमुख, कलिम पिंजारी आशिष भंसाली, स्वप्निल श्रीखंडे, जाकिर भाई यांनी संपुर्ण शहरात फिरुन अन्नदान केले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालय, पाचपांडे हॉस्पिटल, गायत्री हाॅस्पिटल, श्रीराम माॅटर्निटी नर्सिंग होम, कुसुमश्री नर्सिंग होम, डाॅ.राहुल ठाकोर यांचे मुक्ताई हाॅस्पिटल, शोभा हाॅस्पिटल आरोग्यम हाॅस्पिटल, संजीवनी हाॅस्पिटल, वात्सल्य बाल रुग्णालय या हाॅस्पिटल मध्ये रुग्णांना जेवण पुरविण्यात आले. यावेळी अन्नदाते विरेंद्र भोईटे व समाज सेवकांचे यावेळी रुग्णांनी आभार मानले. तसेच वंदे मातरम गृपच्या या रोजच्या समाजसेवेचे शहरातील सर्वच थरातुन सध्या कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound