मुक्ताईनगर तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन

 

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आज मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव, टाकळी, महालखेडा, इच्छापूर, निमखेडी बु। ह्या गावांमध्ये शिवसेना, युवासेना शाखा फलकाचे अनावरण केले तसेच ह्या गावांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.

तसेच मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील वडगाव येथील महादेव मंदिरात पूजन करून आशीर्वाद घेत बाळासाहेबांची शिवसेना- गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक शिवसंपर्क अभियानाची सुरवात केली.

त्यामध्ये वडगाव येथे- महादेव मंदिर पेव्हर ब्लॉक बसविणे (10 लक्ष), स्मशानभूमी बांधकाम (10 लक्ष),

टाकळी येथे सामाजिक सभागृह बांधकाम (10 लक्ष) ,

महालखेडा येथे स्मशानभूमी बांधकाम करणे (10 लक्ष), अश्या विविध विकासकामाचे भूमिपूजन केले आणि ह्या गावांमध्ये जनतेशी संवाद साधत विविध अडचणी जाणून घेतल्या, आणि घरोघरी बाळासाहेबांची शिवसेना व शिवसैनिक ह्यासाठी जनतेशी सुसंवाद साधत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे जनतेसाठी सुरू असलेल्या विकास कामांचे आणि जनतेच्या हिताच्या निर्णयांचे माहिती दिली.

आजच्या शिवसंपर्क अभियानाच्या संपर्क दौऱ्यात निमखेडी बु। येथे कॉर्नर सभेत जमलेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आणि ह्या गाववांमध्ये विकासासाठी केलेल्या 7 कोटी 56 लाखांच्या विविध विकासकांमांविषयी माहिती दिली. मतदारसंघात लवकरच औद्योगिक क्षेत्रात मुक्ताईनगर मतदारसंघाच्या जनतेसाठी MIDC प्रकल्प उभा राहील, ह्यासाठी सुरू असलेला शासन दरबारी निर्णय येत्या काही दिवसात शासन निर्णयसह घोषित होईल असे सांगितले. तसेच मुक्ताईनगर मतदारसंघात आज पर्यंत 30 वर्षात मागील जन प्रतिनिधीने मतदारसंघ विकास न करता फक्त स्वतःच्याच घरातच कसे पदे मिळतील ह्या कडे लक्ष दिले, फक्त पूल बांधून झाला म्हणजे विकास नव्हे तर इतर विविध विकासाची कामे केलीच नाहीत, आज पर्यंत विविध खात्याचे मंत्री पदे भूषविले, विरोधी पक्षनेते पदी होते; मनात आणले असते तर मतदारसंघ सुजलाम सुफलाम केले असता, पण असे न करता फक्त स्वतःचा विकास केला, जनतेच्या प्रश्नाकडे कधी लक्षच दिले नाही असे सांगत आज आमदार महोदयांनी मार्गदर्शन करतांना जनतेच्या सेवेत मी स्वतःला मतदारसंघातील जनतेचा सालदार समजतो असे संबोधित करत विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे संगीतले.

शिवसंपर्क अभियान प्रसंगी गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक ,,, ह्या विषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रंदिवस झटत जनतेच्या हिताचे निर्णय घेत विकास कामाचे ब्रीद उराशी बाळगून काम करत असल्याचे सांगितले, आज मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरत बाळासाहेबांची शिवसेना घरा घरात कसे पोहचवू आणि शिवसैनिक निर्माण करू ह्या विषयी मार्गर्दशन केले.

प्रसंगी सोबत तालुका प्रमुख छोटूभाऊ भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनीलभाऊ पाटील, शिवराज पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे अफसर खान, उप तालुका प्रमुख- शिवाजी पाटील, प्रफुल पाटील, नवनीत पाटील, नरेंद्र पाटील, किशोर पाटील, सूर्यकांत पाटील, शेषराव कांडेलकर, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, आरिफ आझाद, मुकेश वानखेडे, संतोष कोळी, संतोष मराठे, पियुष महाजन, युनूस भाई, नुरा भाई, निलेश शिरसाठ,सईद बागवान,वसंत भलभले, महेंद्र मोंढाळे, प्रमोद कोळी, प्रमोद सोनार, प्रमोद इंगळे, गोपाळ सोनवणे, चंद्रकांत धाडे , अमोल पाटील, विनोद पाटील, योगेश मुळक, दीपक वाघ, सुदाम जाधव, रंगलाल चव्हाण, पवन चव्हाण, अनिल पाटील, नारायण पाटील, तानाजी पाटील, अजय पाटील, दीपक पवार, सरपंच शीतल सोनवणे, संगीता गाजरे, छाया झोपे, सविता कांडेलकर, विशाल नारखेडे, अमोल कांडेलकर, पदमाकर तायडे, मजजीत खान, डॉ. सुरेश महाजन, गणेश सोनवणे, विष्णू पाटील, शुभम शर्मा, रितेश सोनार, यांचेसह शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content