मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कृषी धोरण २०२० अंतर्गत कृषी पंपधारकांनी योजनेत लाभ घेऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याकरिता व प्राप्त वीज बिलाच्या तक्रारींच्या निवारणाकरीता मुक्ताईनगर तालुक्यात विविध गावांमध्ये तक्रार निवारण मेळावा व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता व उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर ढोले यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.११ मार्च रोजी अंतुर्ली कक्ष येथे तक्रार निवारण मेळावा ( शिबीर) आयोजित करण्यात आले. शनिवार दि. १२ मार्च रोजी कोथळी व चांगदेव , कुऱ्हा काकोडा येथे कृषी धोरण २०२० योजनेबद्दल जागृती व माहितीकरिता शिबीर घेण्यात आले. आज दि. १४ मार्च रोजी हरताळा येथे शिबरीचे आयोजन करण्यात आले. या व्यतिरिक्त मुक्ताईनगर विभागाअंतर्गत बोदवड उपविभागीय कार्यालय अंतर्गत उपकार्यकारी अभियंता सचिन मुंडे यांच्या मार्गदर्शनात यांच्या उपस्थितीत दि. ११ मार्च रोजी वाकी येथे कृषी धोरण २०२० योजने अंतर्गत तक्रार निवारण व माहिती शिबीर आयोजित करण्यात आले. दि. १४ मार्च रोजी निमखेड बोदवड येथे शिबिरचे आयोजन करण्यात आले. तसेच वरणगाव उपविभागीय कार्यालय अंतर्गत उपकार्यकारी अभियंता श्री. गाजरे व सहाय्यक लेखापाल दिपाली सोनार याच्या उपस्थितीत वरणगाव उपविभागाअंतर्गत तळवेल कक्ष येथे तक्रार निवारण मेळावा ( शिबीर) आयोजित करण्यात आले. यात असंख्य शेतकरी बांधवांनी सहभाग घेऊन वीजबिल कोरे करून योजनेचा फायदा घेण्याचे आश्वासन दिले व वीजबिल दुरुस्तीची बाबात पुढील कारवाई करण्यात आली.
शिबीर दरम्यान अंतुर्ली कक्ष येथील ग्राहक नूर मोहम्मद शेख कदर रा. अंतुर्ली यांनी योजनेमध्ये भाग घेऊन १ लक्ष २७ हजारचा भरणा केला. तसेच तळवेल येथील ग्राहक वामन मीठाराम झोपे यांनी १ लक्ष ५६ हजार व ज्ञानदेव तुकाराम पाटील यांनी १ लक्ष १८ हजाराचा भरणा केला. सर्व्ह अधिकारी / कर्मचारी ग्राहकाचे आभार व अभिनंदन केले. विविध शिबिरांमध्ये कक्ष अभियंता कक्ष अभियंता सचिन आठवले ,सहाय्यक अभियंता अमोल राणे , सहाय्यक अभियंता नितीन महाजन, सहाय्यक अभियंता प्रदीप खैरे तसेच सर्व कक्षातील जनमित्र वर्गाने परिश्रम घेतले. तसेच कार्यकारी अभियंता यांनी कळवले कि, मार्च २०२२ मध्ये विविध कक्षाअंतर्गत शिबिरे घेण्याचे ठरविले आहे. तरी ग्राहकांना विनंती कि जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.