मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे अडीच महिन्यांपासून प्रलंबित असलेले जातीचे दाखले, केंद्रीय जातीचे दाखले, नॉन क्रिमिलियर तात्काळ मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मुक्ताईनगर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, केंद्रीय जातीचे दाखले हे मागील अडीच महिन्यांपासून सुविधा केंद्रामार्फत भरण्यात आलेले असून सेवा हमी कायद्याअंतर्गत कमीत कमी एका व जास्तीत जास्त 21 दिवसांच्या आत संबंधित विद्यार्थ्यांना दाखले मिळणे बंधनकारक आहे परंतु तालुक्यातील विद्यार्थ्यांचे दाखले मागील अडीच महिन्यांपासून प्रलंबित आहे या संबंधात सदर विद्यार्थी सुविधा केंद्र, तालुका प्रशासनाकडे वारंवार येरझारा मारत असून सदर विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून उडवा उडवी चे उत्तर मिळत असून संबंधित विद्यार्थी त्रस्त झालेले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या दिवसात निकाल लागल्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी सदर वरील प्रमाणपत्रांची आवश्यकता असून की सेवा हमी कायद्यानुसार 21 दिवसांच्या आत सदर प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक असून मागील अडीच महिन्यांपासून प्रलंबित असलेले वरील दाखले विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नियमानुसार तात्काळ मिळण्यात यावे असे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे