मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे केलेल्या आंदोलनात प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे त्यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत त्यांच्यावर केलेल्या कार्यवाहीचा तीव्र निषेध करण्यात आला.
स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी कापुस-सोयाबीनला भाव मिळावा, पिक विम्याची प्रलंबित रक्कम मिळावी, अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळावी यासाठी यासाठी त्यांनी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एल्गार मोर्चा काढला होता. त्यानंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे मुंबई येथे अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा प्रशासनाने खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी प्रशासन व शासनाचा तीव्र निषेध करत शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने 11 फेब्रुवारी रोजी रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाने त्यांना त्यापासून रोखले व रविकांत तुपकर यांनी शांततेच्या मार्गाने मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले परंतु प्रशासनाने अचानक शेतकऱ्यांवर लाठी चार्ज करत रविकांत तुपकर यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांच्यासह शेतकऱ्यांना अटक केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांतर्फे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शवण्यासाठी व प्रशासनाकडून त्यांच्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या निषेधार्थ रविकांत तुपकर यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद सौंदळे, सचिन पाटील, महेंद्र धनगर, हेमंत पाटील, रामलाल पाटील, दिलीप पान पाटील, ईश्वर बेलदार, नितीन कोळी ,मयूर पाटील, गजानन सोनवणे, भास्कर पाटील, गोलू पाटील, समाधान पाटील ,किरण पाटील, गजानन वाघ , किरण कळस्कर, बहादुर पाटील आदी शेतकरी उपस्थित होते