Home धर्म-समाज मुक्ताईनगरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने धुर फवारणीला सुरुवात !

मुक्ताईनगरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने धुर फवारणीला सुरुवात !


मुक्ताईनगर, प्रतिनिधी| शहरात विविध आजाराने डोकेवर काढले आहे. त्यात डेंगूचा रुग्ण आढळून आल्यामुळे शहरातील प्रभाग क्र १४ मध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुर फवारणीला सुरुवात झाली आहे.

 

मुक्ताईनगर शहरात सध्या विविध आजाराने धुमाकूळ घातले आहे. त्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संसर्ग आजाराला आटोक्यात आणण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका सविता सुभाष भलभले यांचा पुत्र वसंत भलभले यांनी प्रभाग क्रमांक १४ मध्ये धुर फवारणीला सुरुवात केली आहे. यामुळे जनतेनी स्वतः आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाडण्याचे आव्हान पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आहे. यावेळी वसंत भलभले व प्रभाकर कोळी हे उपस्थित होते.


Protected Content

Play sound