मुक्ताईनगरातील दहीहंडी जल्लोषात

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरात नावाजलेले सर्व समाज विशाल गणेश मंडळतर्फे आयोजित संताजी नगरातील दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

दरम्यान,मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे खंड पडलेल्या दहीहंडी हा सण गोविंदांनी जल्लोषात साजरा केला. सर्व समाज विशाल गणेश मंडळ हे मुक्ताईनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी प्रेक्षकांची पण भरपूर गर्दी असते.

तथापि, जेवढ्या उत्साहामध्ये दहीहंडी साजरी झाली तेवढ्या उत्साहाने गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करणार असे मंडळाच्या कार्यकर्त्यांची म्हणणे आहे. विशेष म्हणजे या मंडळामध्ये लहान बालगोपालांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो.

Protected Content