जळगाव प्रतिनिधी । युरीया खताची निर्धारीत दरापेक्षा जादा दराने विक्री, तसेच खत व किटकनाशक कंपनीचे उगम प्रमाणपत्र परवान्यात समाविष्ठ न करता खरेदी, साठवणुक व विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने मुक्ताईनगर येथील सागर सिडस या कृषी केंद्राचा परवाना निलंबीत करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, कृषि विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी, मुक्ताईनगर व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांनी संयुक्त तपासणीत युरीया खताची निर्धारीत दरापेक्षा जादा दराने विक्री, तसेच खत व किटकनाशक कंपनीचे उगम प्रमाणपत्र परवान्यात समाविष्ठ न करता खरेदी, साठवणुक व विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने मे. सागर सिडस, मुक्ताईनगर, जि. जळगाव या कृषि केंद्राचा खत परवना २ जुलै २०२० पासुन ३ महिने व किटकनाशक परवाना १ महिन्यासाठी कृषि विभागामार्फत निलंबित करण्यात आला आहे.
दरम्यान, शेतकरी बांधवांनी खते खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे व बिलामध्ये कंपनीचे नाव, पत्ता, रक्कम व इतर बाबींचे रकाने भरलेले असल्याची खात्री करुनच खते खरेदी करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.