मुकेश कुरील यांच्या संविधान साक्षरता अभियान सायकल दौऱ्यास प्रारंभ

जळगाव, प्रतिनिधी | येथील मुकेश कुरील यांच्या संविधान साक्षरता अभियान दौऱ्यास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वे स्टेशन येथील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून प्रारंभ करण्यात आला.

 

आज गुरुवार दि. ५ नोव्हेंबर रोजी जळगावचे मुकेश कुरील यांनी बसपाचे संस्थापक अध्यक्ष काशीराम यांच्याकडून प्रेरणा घेऊन संविधान साक्षरता अभियान दौरा काढत दिल्लीकडे सायकलवरून प्रयाण केले. ते दिल्ली  येथे २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहचणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सांगता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भारतीय संविधानाची प्रत देऊन होणार आहे. भारतीय संविधान जनसामान्यांपर्यंत पोहोचावे व त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी हा उदात्त विचार घेऊन मुकेश कुरील निघालेले आहेत. प्रवासादरम्यान, लागणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांमधील विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनाही या अभियानाची माहिती देऊन संविधान भेट देण्यात येणार आहे.

 

मुकेश कुरील यांच्या अभियानास शुभेच्छा देण्यासाठी जळगावातील विविध समविचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, छावा मराठा महासंघांचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे ,धडगावचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, महासंघाचे रविद्र तायडे यांनी मार्गदर्शन केले .यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे, ,सामाजिक कार्यकर्ते संदीप ढंढोरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक महानगर अध्यक्ष निलेश बोरा, सामाजिक कार्यकर्ते दिलीप अहिरे , जयपाल धुरंधर, भिकन सोनवणे , संदीप हिरोळे , चंद्रकांत नन्नवरे , प्रताप बनसोडे , गौतम निकम, प्रदीप मगरे, किरण अडकमोल, विनय निंबाळकर, खुशाल सोनवणे व बीएम फाउंडेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग सह सर्व समाजबांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. आनंद सोनवणे तर आभार हेमंत बिऱ्हाडे यांनी मानले.

Protected Content