मुंबई (वृत्तसंस्था) रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आता जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. ब्लूमबर्ग इंडिकेशनने दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांनी यावर्षी २२ अब्ज डॉलर्स नफा कमावला आहे. यामुळे आता त्यांची संपत्ती ८१ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.
कोरोनाकाळात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तब्बल २२ अब्ज डॉलर्सची संपत्ती कमवली आहे. यामुळे आता त्यांची संपत्ती ८१ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. त्यामुळे आता ते आता जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. संपत्तीमधील या वाढीमुळे त्यांनी फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकून अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींमध्ये प्रथम क्रमांकावर तर अॅमेझॉनचे जेफ बेजोस तर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स दुसऱ्या आणि फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग तिसऱ्या क्रमांकावर आहेत.