मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई आणि पुण्यासह आसपासच्या शहरांमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे राज्य सरकार येथील लॉकडाऊन जूनपर्यंत वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ५ हजारावर गेला असून दिवसाला २०० रुग्ण एवढ्या सरासरीने रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी पुणे परिसरात १०४ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे मुंबई आणि पुण्यातील एमएमआर परिसरातील लॉकडाऊन कसा उठणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या शहरांमध्ये रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. यामुळे तेथील बंदोबस्त आणखी कडक करण्याची गरज आहे. लोकल ट्रेन, बस, दुकाने आणि आस्थापनांवरील बंदी जून संपेपर्यंत राहणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितलेय. याबाबतचे वृत्त ईकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. दरम्यान, मुंबईतच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ५ हजारावर गेला असून दिवसाला २०० रुग्ण एवढ्या सरासरीने रुग्ण सापडत आहेत. तर गुरुवारी पुणे परिसरात १०४ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.