मुंबई (वृत्तसंस्था) आज (रविवार) दुपारपर्यंत महाराष्ट्रात १३४ नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत ११३ रुग्ण आहेत. राज्यात एकूण करोना रुग्णांची संख्या आता १८९५ वर गेली असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
देशातील सर्वात जास्त कोरोना प्रभावित राज्य महाराष्ट्र बनले आहे. राज्यात आतापर्यंत १ हजार ७७८ प्रकरणे समोर आली आहे तर १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अतिगंभीर म्हणजेच कोरोना हॉटस्पाट असलेले विभागांच्या संख्येत आज २ ने वाढ करण्यात आली आहे. कालपर्यंत मुंबईत ५ हॉटस्पॉट विभाग होते. आता त्यात एल विभाग कुर्ला आणि एम पूर्व चेंबूर, गोवंडी विभागांची भर पडली आहे.