मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत लॉकडाउन संपेपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंद राहणार आहेत. मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी यासंबंधी स्पष्ट माहिती दिली आहे.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले की, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री ३० एप्रिल २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला असल्याने मद्यविक्री ३ मे २०२० पर्यंत पूर्ण दिवस बंद राहील. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे योग्य पालन केले तर मद्यविक्रीची दुकाने सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते.