मुंबईत मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबई: वृत्तसंस्था । मुंबईत मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाकडून माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने माहिती दिल्यानंतर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरात ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबईत दहशतवादी आणि देशविरोधी ड्रोन, रिमोटवरील मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, मिसाइल, पॅराग्लायडरद्वारे हल्ला करू शकतात, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. अतिमहत्वाच्या व्यक्ती किंवा गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकतात. मुंबईसह राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले जाऊ शकते, असेही पोलिसांनी सांगितले.

Protected Content