नालासोपारा वृत्तसंस्था । मुंबईतील तुलिंज पोलीस ठाण्यात एका पोलीस हवालदाराने आत्महत्या केली आहे. स्वत:वर गोळ्या झाडून हवालदाराने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमाराची ही घडली आहे. सखाराम भोये असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. सखाराम यांच्या अशा जाण्यामुळे पोलीस दल हादरले आहे. सखाराम यांनी ऐवढं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे सखाराम भोये यांनी पोलीस ठाण्यातच गोळी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून पुढली तपास सुरू केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, सखाराम यांनी आत्महत्या का केली ? याचा तपास सध्या सुरू आहे. यासाठी पोलीस त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.