मुंबईच्या नायर रूग्णालयात डॉ. मनिष महाजन यांची नियुक्ती

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते सन्मान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांची उच्च शिक्षणासाठी मुंबई येथील नायर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मानसोउपचार तज्ज्ञ म्हणुन नियुक्ती झाली.

प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून दिलेल्या उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल किनगावसह परीसरातील नागरीकांनी त्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात डॉ. मनिषा महाजन यांच्या कार्याचा गौरव करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही डॉ. महाजन यांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल गौरव कैला.

किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सन २०१२ ते २०१९ पासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नव्हते मात्र २०१९ ला डाँ.मनिषा महाजन यांनी येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार सांभाळला

महीला वैद्यकीय अधिकारी असतांनाही डाँ.महाजन यांनी खंबीरपणे व वेळेचे भान न ठेवता स्वतःला आरोग्यसेवेत झोकुन दिले सातपुड्याच्या जंगलात काही गाव अशी आहेत ज्या ठिकाणी आजपर्यंत कोणीही वैद्यकीय अधिकारी पोहचले नव्हते मात्र डाँ.महाजन यांनी पहाडात तब्बल १३ कि.मी.पायी प्रवास करत आदीवासी पाड्यांनवर नागरीकांची आरोग्य तपासणी करत औषधोपचार केले.

डॉ. मनिषा महाजन या आपल्या सेवेदरम्यान मुख्यालयातच निवासाला राहील्या व दिवस असो किंवा रात्र त्यांनी परीसरातील नागरीकांना आरोग्य सेवा दिली मग ती रिक्षा मध्ये झालेली प्रसूती असो किंवा रस्त्यावर रात्री झालेला अपघात त्यांनी कधीही कशाची तमा न बाळगता रुग्ण आपला देव या भावनेने रूग्णसेवा दिली. डॉ. महाजन यांचा जिवन प्रवास अत्यंत संघर्षमय राहीला आहे. एमबीबीएस पदवी मिळवण्यापासून ते मागील ८ वर्षात सरकारी नोकरीमध्ये असलेली निडर एकटी स्त्री आणि स्त्री असूनही खंबीरपणे त्यांनी आरोग्य सेवेला महत्व दिले. प्रशासनातील बारीक गोष्टींनपासून ते धडक निर्णय घेण्यापर्यंतची क्षमता या महीला सिंघम वैद्यकीय अधिकारी मध्ये आहे.

कोरोणा काळात तालुक्यातील सर्वात लहान वैद्यकीय अधिकारी असतांना देखील त्यांच्यातील काम करण्याची प्रशासकीय पद्धत व कर्मचारी वर्गावर असलेला वचक यामुळे तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे यांनी आपला चार्जे डॉ.मनीषा महाजन यांच्या कडे सोपवला होता.विशेष म्हणजे कोविड काळात डॉ.मनीषा महाजन यांनी अहोरात्र आरोग्यसेवा दिली यादरम्यान त्या आपला ९ वर्षाचा मुलगा व वयोवृद्ध आई,वडील यांना सुमारे ८ महीने भेटल्या नाहीत.तसेच किनगाव येथील सर्व कर्मचारी व पंचक्रोशीतील खाजगी डॉक्टर्स आणि काही देणगीदार यांच्या मदतीने आयुष्यमान भव अंतर्गत भव्य आरोग्य मेळावा ८ आँक्टोबर रोजी घेण्यात आला या आरोग्य मेळाव्याची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली या महाआरोग्य शिबिरात हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.जयंत मोरे यांनी डॉ.मनिषा महाजन यांच्या कार्याचा सन्मान केला व जिल्हाधिकारींच्या दालनात डाँ.मनिषा महाजन यांचा जिल्हाअधिकारी आयुष प्रसाद यांनी सत्कार केला.तर परीसरातील नागरीकांनीही डाँ.महाजन यांना निरोपदेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Protected Content