पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मुंदाणे येथे आज रोजी जि प प्राथमीक शाळा मुंदाने घागुर्ले येथे शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्व तयारी मेळावाआयोजित करण्यात आला होता.
यात मुलांची प्रभात फेरी ,नवीन येणार्या मुलांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. त्याचप्रमाणे मुलांचे पाऊलचे ठसे घेऊन अविस्मरणीय असे स्वागत करण्यात आले. नवीन आलेल्या शिक्षकांचे स्वागत करण्याता आले. पुस्तक वाटप ही करण्यात आली.
या कार्यक्रमास गावचे सरपंच श्रीमती पूजा ताई एकनाथ पाटील, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, शालेय शिक्षण समिती सदस्य राजकुमार पाटील, अंगणवाडी सेविका शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे पालक या मेळाव्याला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती वैशाली देसले यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन, व मराठी शाळेविषयी जनजागृती केली. मनोज नेवरे सरांनी स्वतःचा परिचय करून दिला.श्रीमती मनीषा पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून सांगता केली.