जळगाव प्रतिनिधी । स्व. नरेंद्रअण्णा पाटील फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेली ‘मी रक्तदाता’ नोंदणी मोहीम स्थगित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या संदर्भात आयोजकांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उद्या दिनांक १४ रोजी आयोजित स्व. नरेंद्रअण्णा पाटील फाउंडेशन जळगाव प्रस्तुत ‘मी रक्तदाता नोंदणी अभियान’ चळवळीचा कार्यक्रम स्थगित* करण्यात आला असून आज मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी पुढील आठवड्यातील अधिवेशन रद्द करत उद्या दिनांक १४-०३-२०२० रोजी अधिवेशन संपवण्याच्या सूचना केल्यात. यामुळे ना. बच्चुभाऊ कडू व ना. गुलाबरावजी पाटील यांना त्या ठिकाणी थांबणं हे अनिवार्य आहे. यामुळे संबंधीत कार्यक्रम हा स्थगित करण्यात आला असून लवकरच पुढील तारीख ही कळविली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.