पाटणा : वृत्तसंस्था । “मी निवृत्तीबद्दल वक्तव्य केलं नव्हतं. मी आपल्या प्रत्येक निवडणुकीच्या अखेरच्या रॅलीत कायम एक गोष्ट सांगत असतो. शेवट चांगला तर सर्वकाही चांगलं. तुम्ही माझं भाषण ऐकाल तर तुम्हाला त्याची कल्पना येईल,” असं नितीश कुमार म्हणाले.
बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नितीश कुमार पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले. जदयूच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर एनडीए सरकार स्थापन केलं जाईल अशी माहिती दिली. आपण मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नसून एनडीए निर्णय घेईल असं म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी समोर येत आपल्या ‘अखेरची निवडणूक’ या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.निवृत्ती घेणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सप्ष्ट केलं.
. भविष्यात आपण निवृत्त होणार नसून आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यापूर्वी पूर्णियामध्ये जदयूच्या एका उमेदवारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत नितीश कुमार यांनी संबोधित केलं होतं. “निवडणुकीचा अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणूक संपणार आहे आणि ही माझी अखेरची निवडणूक आहे. शेवट चांगला तर सर्वकाही चांगलं,” असं नितीश कुमार म्हणाले होते.
जदयूच्या जागा कमी होण्यासंबंधी विचारण्यात आलं असता नितीश कुमार यांनी जो निकाल आला आहे त्याचं विश्लेषण करण्यात आलं. आमच्या जागांवर काय परिणाम झाला याबाबत अध्ययन केलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली. नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे २०१५ मध्ये ७१ जागा मिळाल्या होत्या