नवी दिल्ली वृत्तसंस्था । मिस्त्री कुटुंबाचे शापूरजी पालनजी समूह आणि टाटा ग्रुप यांच्यातील वाद आता पुन्हा तिव्र झाला आहे. शापूरजी पालनजी समूहाने शेअर गहाण ठेवून पैसे उभे करण्याच्या योजनेला टाटा समूहाकडून रोखले जात आहे. हे एक प्रकारचे शेअरधारकांच्या अधिकाराचे अतिक्रमण आहे. टाटा ग्रुपकडून सूड घेण्यासाठी असे केले जात असल्याचा आरोप एसपी समूहाने केला आहे.
मिस्त्री समूहाचा टाटा ग्रुपमध्ये १८.५ टक्के इतका हिस्सा आहे. मिस्त्री समूह हा हिस्सा गहान ठेवून रक्कम उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. या विरुद्ध टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून टाटाने एसपी समूहाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या शेअर गहाण ठेवण्यापासून रोखले आहे.
एसपी समूह विविध माध्यमातून ११ हजार कोटी रुपये जमवण्याचा प्रयत्न करत आहे. टाटा सन्समधील १८.३७ टक्के पैकी काही हिश्यासाठी कॅनडातील एका गुंतवणूकदारासोबत ३ हजार ७५० कोटींचा करार केला आहे. एसपी समूह आणि कॅनडातील गुंतवणूकदार यांच्यातील करार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी टाटा सन्सने कोर्टात धाव घेतली.
मिस्त्री समूह हा टाटा समूहातील टाटा सन्समधील सर्वात मोठा शेअरधारक आहे. मिस्त्री कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे सदस्य असलेले सायरस मिस्त्री यांना २०१२ साली टाटा सन्सचे चेअरमन करण्यात आले होते. पण २०१६ साली त्यांना या पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर दोघांमध्ये मोठी कायदेशीर लढाई झाली. या निर्णयात मिस्त्री यांना टाटा समूहाचे चेअरमनपद पुन्हा मिळणार होते