जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.पी. पी. माहूलीकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ डॉ.पी. पी. पाटील यांच्याकडे सर्व विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी विद्यापीठाला दिलेल्या मागील निवेदनांवरती कुठल्याही प्रकारचा विद्यापीठाकडून उत्तर न मिळाल्याबद्दल विचारणा करता गेले होते. संशोधन चौर्य प्र-कुलगुरू प्रा. पी. पी. माहूलीकर यांच्या बाबतीतील कारवाई विद्यापीठाने अद्यापही केलेली नाही. संशोधन या विषयांमध्ये विद्यापीठाची नामुष्की ओढवली गेली असता विद्यापीठ संघटनांनी आक्रमक केला आहे. प्र-कुलगुरू यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्याकडे केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रानुसार विद्यापीठाने संदर्भात समिती गठीत करणे गरजेचे असते. परंतु सदर समितीबाबत विद्यापीठाचे कुलगुरू व प्र-कुलगुरू यांना विचारले असता सदर समिती बाबतीत कुलगुरू व कुलगुरू यांच्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती अशा प्रकारची समिती अस्तित्वात असते याबाबत मधील माहिती स्वतः कुलगुरू यांना माहिती नसल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन होत असल्याची माहिती प्रशासनाला होती. तशी कबुली दिल्यानंतर विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी कुलगुरू प्र-कुलगुरू यांच्या वरती आक्रमकपणे धारेवर घेत तात्काळ समिती गठीत करावी याबाबतची मागणी केली. काही निर्णय न केल्यास संघटनांतर्फे दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील. आजपर्यंत केलेल्या तक्रारींवर दोन दिवसात लेखी खुलासा नाही मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल. परीक्षा विभागाचे इ कामे निविदा न देण्यात येते असा देखील विचारण्यात आला. वरील दोन्ही मागण्यांसंदर्भात विद्यापीठाने कारवाई न केल्यास विद्यार्थी संघटना पोलिसात तक्रार देतील व वेळप्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागता येईल असा इशारा देण्यात आला.